कणकवली (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हयातील युवक व युवती तसेच नवीन उद्योजकांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांचा पंडीत दीनदयाळ उपाध्याय भव्य महा रोजगार व स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.सोमवार दि. ४ मार्च २०२४ रोजी कणकवली कॉलेज कणकवली येथे या रोजगार मेळाव्याचे आयोजित केले आहे. यासाठी दहावी, बारावी, पदवीधर, आय.टी.आय., इंजिनिअरींग, अॅग्रीकल्चर डिप्लोमा तसेच इतर शैक्षणिक पात्रतेनुसार ऑटोमोबाईल, बॅकींग, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, टिचींग, मार्केटींग, मॅकॅनिक, आय.टी.आय. संबंधी ट्रेड, अॅग्रीकल्चर यासारख्या क्षेत्रामध्ये ४०० पेक्षा जास्त पदांच्या रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. स्वयंरोजगार करण्यास इच्छुक उमेदवारांकरीता शासनाच्या विविध मंडळाचे बीज भांडवल पुरवठा करणाऱ्या शासकीय योजनांची माहीती देण्यात येणार आहे.
त्यासाठी उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटासह रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन कणकवली, देवगड,वैभववाडी चे भाजप आमदार श्री. नितेश राणे यांनी केले आहे.