आमदार नितेश राणेंचा वैभववाडी तालुक्यात विकासकामांचा धडाका

करूळ, कोकिसरे, सोनाळी, गडमठ मध्ये विकासकामांचे केले भूमिपूजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ, कोकिसरे, सोनाळी व गडमठ येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून रस्ते, ब्रीज, स्मशानशेड, शाळा वर्गखोली, संरक्षक भिंत आदी विविध कामे मंजूर झाली आहे. त्यामध्ये कोकिसरे येथील मोरेवाडी, पालकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, झोरेवाडी ते सिद्धेश्वरवाडी शाळा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, नारकरवाडी, मांगरवाडी पूल बांधणे, अंबाबाई रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, खांबलवाडी खालचीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, सोनाळी येथील नदीवर पूल बांधणे, सोनाळी येथे संरक्षक भिंत बांधणे, सोनाळी येथे लहान ब्रीज बांधणे, सोनाळी रास्त दुकानाकडे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, लोरे ते गडमठ रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे,करूळ खडकवाडी ग्रा.मा. 53 रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. करूळ खडकवाडी ग्रा.मा. 53 वर लहान पुलाचे बांधकाम करणे. विद्या मंदिर करूळ खडकवाडी शाळा नवीन वर्ग खोली बांधणे. करुळ भट्टीवाडी ग्रा.मा. 51 खडीकरण व डांबरीकरण करणे. करुळ भट्टीवाडी येथील स्मशानशेड बांधणे. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती भालचंद्र साठे, माजी सभापती अरविंद रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईणकर,उपनगराध्यक्ष  संजय सावंत, अक्षता डाकळे, बंड्या मांजरेकर, हुसेन लांजेकर, देवानंद पालांडे, राजू पवार, प्राची तावडे, अवधूत नारकर, प्रदीप नारकर, करुळ सरपंच नरेंद्र कोलते, प्रकाश सावंत, बाळा कदम, अशोक माने, बाळा मोरे, सचिन कोलते, भास्कर सावंत, संजय कदम, माधवी राऊत, राजू कदम, अनंत कदम, विवेक कदम, रमेश पांचाळ, विजय सावंत, रोहित रावराणे, उदय सावंत, जितेंद्र पवार, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, महीला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!