रागाच्या भरात काजू बागेत आलेल्या गाय वासरावर कोयत्याने केला वार

बागेचा मालक नफीस गौस पाटणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील तोंडवली बोभाटेवाडी येथील आपल्या काजूच्या बागेमध्ये गाय व वासरू गेल्याच्या राग आल्याने आरोपीने आकडीतील कोयत्याने गाय व वासरू यांच्या पायावर मारत दुखापत केली ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजता घडली या प्रकरणी संशयित आरोपी नफीस गौस पाटणकर वय 29 राहणारा नांदगाव मुस्लिम वाडी याच्या विरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला

या संदर्भात अधिकृत असे की फिर्यादी विशाल विलास मिस्त्री राहणारा तोंडवली बोभाटेवाडी याची गाय आणि वासरू शनिवारी सकाळी नऊ वाजता सुमारास संशयित आरोपी नफीस गौस पाटणकर यांच्या तोंडवली येथील बागेत गेली होती त्यामुळे आरोपीने गाय व तिचे वासरू बागेत आल्याच्या रागातून दोघांच्याही पायावर कोयत्याने मारत गंभीर दुखापत केली होती याबाबत माहिती विशाल मिस्त्री यांना मिळताच त्यांनी पोलीस पाटील विजय मोरे व गावातील ग्रामस्थांना कळवले फिर्यादी श्री मिस्त्री यांनी संबंधित आरोपीच्या काजू बागेत जाऊन गाईला पाहिले असता गाय आणि वासरू वासरू यांना चालताही येत नव्हते त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती त्याबाबत गाय मालक फिर्यादी मेस्त्री यांनी संशयित आरोपी नक्कीच गौस पाटणकर यांना विचारणा केली असता तुझी गुरे माझ्या काजू बागेत घुसून नुकसान करतात आजही माझ्या काजू बागेत आहेत त्यामुळे माझ्याकडे तील गोत्याने त्या गाईवर मी गाईवर मी मारले अशी पोलीस पाटील श्री मोरया यांच्या समक्ष त्याने कबुली दिली असे फिर्यादीत म्हटले आहे याप्रकरणी पोलिसांनी नफीस गौस पाटणकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे

दरम्यान कणकवली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून शनिवारी सायंकाळी घटनास्थळी धाव घेऊन गाय मालक यांना पोलीस ठाण्यात बोलवले होते तसेच संशयित आरोपी नक्कीच गौस पाटणकर याला ताब्यात घेतले होते रात्री उशिरा या प्रकरणी गाय मालकाचे फिर्याद दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली प्रभारी

error: Content is protected !!