पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी वर्षभरात सिंधुदुर्ग ला दिला ३ हजार ८६० कोटी निधी
सिंधुदुर्गात विकासाची गंगा – अजयकुमार सर्वगोड
कणकवली (प्रतिनिधी) : येथील कनकसिंधु या व्हीव्हीआयपी अत्याधुनिक सर्वसोयींनीयुक्त बांधलेल्या इमारतीचे लोकार्पण व जाणवली सापळे बाग ते कणकवली गणपती साणा पुलाच्या कामाचे भुमिपुजन केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे होणार आहे. सिंधुदुर्गात सार्वजनिक बांधकामसाठी गेल्या वर्षभरात ३८६० कोटी विविध विकासकामासाठी प्राप्त झाल्याती माहीती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कामांसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधीची उपलब्धता झाली आहे. पहिल्या टप्प्यातील कणकवली येथील कार्यक्रम झाल्यानंतर वैभववाडी पंचायत समिती इमारतीचे लोकार्पन होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील २९ विविध विकासकामांची भुमिपुजन व लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात येणार आहे. त्यात फोंडाघाट येथे रेस्टहाउसचे नुतनीकरण करण्यात आले असून याठिकाणी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा सहवास लाभला होता. त्यामुळे त्यांचे आठवणी चिरंतर राहण्यासाठी त्यांचे तैलचित्र रेखाटण्यात आले आहे. तसेच अटलबिहारी वाजपेयी यांनी लिहलेली ” स्वतंत्रता दिवस की पुकार ” ही कविता भारतीयांमध्ये स्वाभिमान जागृत करणारी रेखाटण्यात आली आहे. या रेस्टहाऊसचे व तैल चित्राचे अनावरण ऑनलाईन प्रणालीद्वारे मान्यवरांच्या उपस्थित लोकार्पण होईल असे अजयकमार सर्वगोड यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग खाते असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला झुकते माप देण्यात आले आहे. गेल्यावर्षभरात ३८६० कोटी एवढा सर्वाधिक निधी विविध विकास कामांसाठी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागासाठी २५०० कोटी तर सावंतवाडी विभागासाठी १३६० कोटी निधी प्राप्त आहे. जिल्ह्यातील शासकीय मेडीकल कॉलेज, रस्ते, पुल, विविध शासकीय इमारती, कणकवली, देवगड, मालवण, फोंडाघाट, ओरोस, आचरा आदी शासकीय विश्रामगृह अद्यावत बनवण्यात आली आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात येणा-या पर्यटकांची राहण्याची व्यवस्था शासकीय विश्रामगृहात होईल. त्यामुळे सिंधुदुर्गाच्या दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी मदत होईल असे अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले.