चिंदरच्या साहिल सावंत याला झी-नाट्य गौरव मधून सर्वोकृष्ट नेपथ्य प्रायोगिक सन्मान पुरस्कार

चिंदर गावच्या सिरपेचात मानाचा तुरा

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मूळ चिंदर अपराज-कोंडवाडीचा सुपूत्र  साहिल सहदेव सावंत व त्याच्या समवेत राहुल डेंगळे यांना नुकत्याच झालेल्या झी नाट्य गौरव पुरस्कार 2024 वितरण सोहळ्यात, नाटक खुदीराम, लेखक नितीन परब, दिग्दर्शक आशुतोष झरे या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नेपथ्य हा सन्मान सुप्रसिद्ध गायक राहुल रानडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या यशा बद्दल त्याच्यावर सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!