४६ लाखाच्या कुणकवळे बागवाडी साकवाचेही केले भुमिपूजन
वराड सावरवाड रस्त्यासाठी ५ लाख,वराड खालची पालववाडी रस्त्यासाठी ५ लाख रु मंजूर; भूमिपूजन संपन्न
मालवण (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील पेंडूर खरारेवाडी जाणाऱ्या रस्त्यासाठी १ कोटी ४८ लाख रु मंजूर केले आहेत. त्याचबरोबर कुणकवळे बागवाडी साकव (ब्रिज) बांधणे या कामासाठी जिल्हावार्षिक योज़नेतील आ. वैभव नाईक यांच्या कोट्यातून ४६ लाख रु मंजूर करण्यात आले आहेत. आणि आमदार फंडातून वराड गावातील सावरवाड चव्हाणवाडी रस्त्यासाठी ५ लाख व वराड खालची पालववाडी रस्त्यासाठी ५ रु निधी मंजूर केला आहे. या सर्व कामांची भूमिपूजने आज खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. ग्रामस्थांची मागणी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले.
यावेळी कुणकवळे येथे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुका प्रमुख पराग नार्वेकर,युवासेना उपतालुकप्रमुख अमित भोगले, उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण, कुणकवळे उपसरपंच सुरेश राणे, महिला उपजिल्हा संघटक देवयानी मसुरकर, ग्रा. प. सदस्य दळवी बाळकृष्ण मसुरकर,संजय परब,आप्पा नाईक,मोहन चुडनाईक,मुकुंद पारटे,रुपेश वर्दम, प्रभू,आदींसह ग्रामस्थ.
पेंडूर येथे शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, युवासेना उपतालुकाप्रमुख दर्शन म्हाडगूत, ग्रा. प. सदस्य संदीप सावंत,अमित पाडावे,विनोद सावंत, परेश सावंत,सुभाष सावंत, उमेश सावंत,दीपक सावंत,सुनील सावंत,बाळा नाईक,रमेश सावंत, नारायण सावंत, चंद्रमोहन सावंत, मंगेश मुळये,निलेश सावंत, प्रसन्न सावंत, भालचंद्र सावंत, किरण सावंत,सखाराम सावंत, चंद्रहास नाईक, मिलिंद सावंत, बिट्टू सावंत,महेश सावंत,पार्थ परब, भावना कॊरगावकर, रोहित कोरगावकर, उर्मिला सावंत,अनिता चव्हाण, अपूर्वा कोरगावकर,अक्षय मुळये,गौरव मुळये,चैताली सावंत,घनश्याम सावंत, दत्ताराम चव्हाण आदींसह ग्रामस्थ.
वराड येथे सरपंच शलाका रावले, उपसरपंच गोपाळ परब, ग्रा. प. सदस्य किरण रावले, ग्रा. प.सदस्य नंदन केसरकर, ग्रा. प सदस्या किशोरी भगत, शिवसेना शाखा प्रमुख पप्पू चव्हाण, युवासेना शाखा प्रमुख नीरज मांजरेकर, शरद भोगटे, किशोर भगत, वैशाली लोके, कल्पेश ढोलम, भाऊ पालव, सूर्यकांत परब, सुभाष खानोलकर, प्रकाश परब, प्रताप परब, दासू चव्हाण, दादा वराडकर, समीर मुंबरकर, ज्ञानेश्वर चव्हाण, कृष्णा चव्हाण, रुपेश भोगटे, आकाश ढोलम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.