खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन ला जोडणारा शुक नदीवरील तीथवली – चिंचवली पुलाचे भूमिपूजन संपन्न

वैभववाडी व राजापुर तालुक्यातील गावांना खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन अगदी जवळ पडणार

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण या गावातील कोकण रेल्वे मार्गावरील जिल्ह्यातील अनुक्रमे पहिले रेल्वे स्टेशन असलेल्या खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन ला जोडणाऱ्या शुक नदीवरील तीथवली – चिंचवली या पुलाच्या बांधकामालां नुकतेच बजेट मधून ७ कोटी एवढा मोठा निधी मंजूर झाला असून या पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ तथा भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवार दी.१५ मार्च २०२४ रोजी जि.प.माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या शुभहस्ते चिंचवली या गावी श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी माजी जि.प.बांधकाम व वित्त सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार,कणकवली पं.स.समिती माजी सभापती दिलीप तळेकर,वैभववाडी तालुका माजी सभापती श्री.बाळा हरयान,खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर,उपसरपंच महेंद्र गुरव, चींचवली माजी सरपंच रुंजी भालेकर,भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,भाजप कार्यकर्ते भाऊ राणे,उपसरपंच अनिल पेडणेकर,खारेपाटण ग्रा.पं.सदस्य जयदीप देसाई,किरण कर्ले,सौ मानली होणाळे,शितीजां धुमाळे, अमिषा गुरव,श्री यशवंत रायबगकर, शेखर कांबळे आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन करीता केंद्रीय मंत्री नारायणराव राणे माजी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच आमदार नितेश राणे यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून ७ कोटी एवढा मोठा निधी बजेट मधून मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला.त्याबद्दल खारेपाटण व चिंचवली ग्रामस्थानी तसेच दशक्रोशितील कोकण रेल्वे प्रवासी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.चिंचवचली येथे खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन अस्तित्वात आल्यानंतर गेली ७ वर्षे सातत्याने खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनला लागून असणाऱ्या वैभववाडी व राजापुर तालुक्यातील तसेच खारेपाटण दशक्रोशीतील अनेक गावांची येथील शुक नदीवरील पुलावर ब्रीज व्हावा म्हणून मागणी करण्यात येत होती. खारेपाटण शुक नदीवर तीथवली – चिंचवली जोडणारा पूल तयार झाल्यास येथील सबंधित गावातील नागरिकांना खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन प्रवासासाठी अगदी सोयीचे व फायद्याचे ठरणार आहे.याकरिता खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन संघर्ष समितीचे अध्यक्ष नासीर भाई काझी तसेच सचिव सूर्यकांत भालेकर व ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. लवकरच या पुलाच्या बांधकामाला सुरवात करण्यात येणार असून शुक नदीवरील हा पूल रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा जोडणारा तसेच कोकण रेल्वेचा किंबहूना खारेपाटण रोड रेल्वे स्टेशनचा प्रवासी वर्ग वाढ विण्यासाठी मदतगार ठरणार आहे.

error: Content is protected !!