लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने कणकवली पोलीस ठाणे हद्दीत बाजारपेठ, एसटी स्टॅण्ड, पटवर्धन चौक, इत्यादी गर्दीच्या ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला. कणकवली येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हे रूट मार्च घेण्यात आले. कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, पो. उपनिरीक्षक अनिल हडळ, बापू खरात, शरद देठे, हवालदार विनोद चव्हाण, चंद्रकांत माने यांच्यासह १० अधिकारी, ८० अंमलदार, ०२ RCP, १५ होमगार्ड यांची उपस्थिती होते.