निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद ; लोकसभा निवडणूक झाली जाहीर.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग ७ मे रोजी मतदान

महाराष्ट्रात ५ टप्प्यात होणार मतदान ४ जूनला लागणार निकाल

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून आचारसंहिता जाहीर करण्यात आली. आता ४ जूनला मतमोजणी होणार असून त्यादिवशी नवीन सरकार बसणार आहे. दरम्यान देशात ७ टप्प्यात तर महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार आहे. यात सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेची निवडणूक ७ मे ला होणार आहे. याबाबतची माहिती देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यात महाराष्ट्र मध्ये पुढील प्रमाणे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

पहिला टप्पा – १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.

दुसरा टप्पा २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी.

तिसरा टप्पा ७ मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.

चौथा टप्पा १३ मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड.

पाचवा टप्पा २० मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघ.अशा तरेन होणार मतदान ४ जून रोजी लागणार निकाल असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!