आमदार वैभव नाईक, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बंधू संकेत चव्हाण,सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांची होती प्रमुख उपस्थिती
राजकारणापालिकडील अतुल रावराणे – रवींद्र चव्हाण यांच्या मैत्रीचा पुनरप्रत्यय
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधकाम व्यवसायात पदार्पण केले असून रावराणे यांच्या श्री भैरी भवानी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चा कणकवली शहराच्या मध्यवर्ती भागातील नॅशनल हायवे टच असलेल्या नवरे हॉस्पिटलनजीक गणपत्ये चाळ या ठिकाणी श्री भैरी गणेश संकुल या वाणिज्य आणि निवासी अत्याधुनिक संकुलाचे भूमिपूजन अतुल रावराणे यांच्या आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बंधू संकेत चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीत समीर रावराणे दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आले. आमदार वैभव नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक , शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू रावराणे , यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवित अतुल रावराणे यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचे मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज तसेच त्यांच्या खाजगी बंगल्याचे बांधकाम करणारे रघुनाथ नाईक अभिषेक नाईक या प्रोजेक्ट चे बांधकाम करणार आहेत. राणे आणि रावराणे यांचे राजकीय मतभेद असले तरी अत्युच्च बांधकाम दर्जाच्या बाबतीत मात्र एकमत असल्याचे दिसून आले.पिडब्ल्यूडी कणकवली चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड , जिल्हा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष महेश नार्वेकर, उद्योजक गिरीधर रावराणे, सज्जनकाका रावराणे, डॉ. समीर नवरे, माजी नगरसेवक रुपेश रावराणे,आचिर्णे सरपंच रुपेश रावराणे, सचिन सावंत , दीपक सांडव आदींनी रावराणे याना शुभेच्छा दिल्या.यावेळी रावराणे कुटुंबियांसह रघुनाथ नाईक, अभिषेक नाईक, शशिकांत गणपत्ये, अरुण गणपत्ये आदी उपस्थित होते.शुभारंभ आमच्या नवीन प्रकल्पाचा आणि तुमचा स्वप्नपूर्तीचा ! या टॅगलाईन द्वारे अतुल रावराणे यांनी या बिल्डिंग प्रोजेक्ट च्या माध्यमातून अत्युच्च दर्जाचे बांधकाम आणि सुखसोयी ग्राहकांना देणार असल्याचा विश्वास दिला आहे.












