चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने चिंदर सडेवाडी येथे स्ट्रीट लाईट व पायवाटेचा शुभारंभ !

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर सडेवाडी सिद्धेश्वर मंदिर स्ट्रीट लाईट व स्मशानभूमी पायवाट यांचा शुभारंभ जेष्ठ नागरिक भिवनाथ गोसावी व सखाराम गोसावी यांच्या हस्ते भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या उपस्थित काल 16 मार्च रोजी पार पडला. यावेळी सरपंच स्वरा पालकर, भाजप नेते संतोष कोदे, संतोष गावकर, संजय गांधी निराधार मालवणचे अध्यक्ष महेश मांजरेकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, संजय लोके, प्रिया पालकर, रवींद्र सोनू गोसावी, रवींद्र जनार्दन गोसावी, आत्माराम गोसावी, शामराव गोसावी, दत्ता वराडकर, सूर्यकांत गोसावी, रुपेश वराडकर, सदानंद गोसावी, अशोक गोसावी, हरी गोसावी, एकनाथ पवार, गोपाळ गोसावी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!