स्वर्गीय बाळासाहेबांनी उभ्या आयुष्यात आपल्या सिद्धान्ताशी तडजोड केली नाही
मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेसचे डायपर घातलेल्या संजय राऊत याने भाजप वर टीका करू नये. ज्यांना शिवसेना समजली नाही ते राऊत असं बोलत आहेत. स्वर्गीय बाळासाहेबांनी उभ्या आयुष्यात आपल्या सिद्धान्ताशी तडजोड केली नाही. त्यामुळे आपलं पाप बाळासाहेबांच्या नावाने खपवण्याचे काम राऊत आणि उद्धव ठाकरेंनी करू नये.शिवाजी पार्कवरील सभेनंतर जुन्या शिवसैनिकांच्या मनात खदखद निर्माण झाली आहे. ही खदखद लोकसभेत दिसून येईल. उद्धव ठाकरेंना देखील याचा परिणाम दिसून येईल. असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला. हिंदुत्वाचा प्रचार प्रसार वाढविण्यासाठी बाळासाहेबांचे गुण असलेले ओरिजिनल ठाकरे जर महायुतीला मिळत असतील तर त्यांचे स्वागत आहे. असे राज ठाकरे यांच्या युतीत येण्यावे ते बोलले. आदित्य ठाकरे यांनी चहल याच्यावर टीका केली यावे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले तेव्हा इकबाल सिंग चहल सांगायचा मी यांचा तिसरा मुलगा आहे एक आदित्य, एक तेजस आणि तिसरा मुलगा इकबाल सिंग असे लोक सांगायचे.राणेंचे घर तोडण्यासाठी रश्मी ठाकरे दिवसातून तीन वेळा चहल यांना फोन करायच्या मग आता का टीका करत आहेत. ही सुरुवात आहे, अजून बरंच बाकी आहे. राहुल गांधींचा पायगुण आहे ते जिथे जिथे जातील तिथे लोक काँग्रेस सोडणार असा प्रिया दत्त यांच्या अनुशंगाने टीका केली.
राज्यातील अनेक नेते सन्माननीय निलेश राणेंना जन्मदिनाच्या दिवशी भेटून गेले त्यावेळी किरण सामंत देखील आले होते.
उमेदवार महायुतीचा असेल, त्याला आम्ही निवडून आणू.रोहित पवार मंत्रालयात चहा देण्याचं काम करतात हे मला माहित नव्हतं मंत्रालयात काय चालतं ते त्यांना समजतं, त्यांना एफबीआयने सोबत घ्याव. अभिषेक घोसाळकर ची जेवढी चिंता उबाठा नेत्यांना आहे.तेवढी चिंता दिशा सालियान ची पण केली पाहीजे होती. म्हणजे बरच काही बाहेर आलं असतं.