राज ठाकरे आणि अमित शहा यांची दिल्लीत भेट

भाजपा – मनसे एकत्र येणार ?

दिल्ली (न्यूज ब्युराे) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. दिल्लीत ही भेट झाली. या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा रंगली होती. या चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही.मात्र राज ठाकरे हे महायुतीत आले तर ती त्यांच्यासाठी नवी सुरुवात असणार आहे. मनसे सहभागी झाल्यास महायुतीला बळ मिळेल. दक्षिण मुंबईसह मनसेला आणखी कोणते मतदारसंघ दिले जातात, याची उत्सुकता असून, मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नाशिक, पुणे या मतदारसंघांत मनसेची महायुतीला मदत होऊ शकते

error: Content is protected !!