खारेपाटण येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील हनुमान नगर येथील युवक सागर रमेश कोळसुलकर वय ३० वर्षे या युवकाने आज सायंकाळी ४.०० वाजता त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या असलेल्या कोळसुलकर कॉम्प्लेक्स पहिल्या मजल्यावरील टेरेस्टवरील रूम मध्ये छपराच्या लोखंडी बारला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत अधिक वृत्त असे की, मयत सागर कोळसुळकर हा आपला भाऊ तुषार यांच्या समवेत हॉटेल व्यवसाय करत होता. सगळ्यांशी मिळून मिसळून असणारा सागर याने अचानक आत्महत्येच्या घेतलेल्या निर्णयाने सर्वत्र खळबळ माजली असून संपूर्ण खारेपाटण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आत्महत्येच्या घटनेची खबर पोलिसांना मिळताच घटनास्थळी खारेपाटण पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस नाईक उद्धव साबळे यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसून अधिक तपास खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी करत आहेत. तर सागर याच्या पश्चात एक भाऊ भावजय बहिण आजी काका काकी पुतण्या असा परिवार आहे.

error: Content is protected !!