विकास मंगल यांची राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेल संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील निदान पॅथॉलॉजी लॅब चे विकास मंगल यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वैद्यकीय सेल च्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेल चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पंडित गौतम आगा यांनी विकास मंगल यांना दिले आहे. विकास मंगल हे पॅथॉलॉजिस्ट असून मागील 24 वर्षे निदान लॅब च्या माध्यमातून रुग्णसेवा करत आहेत. निदान लॅब च्या माध्यमातून रुग्णसेवा करतानाच समाजसेवा करत आहेत. रुग्णमित्र म्हणून विकास मंगल यांची वेगळी ओळख असून कोल्हापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये रुग्णांना शासकीय योजनेचा लाभ देत मोफत वैद्यकीय उपचार मिळवून देण्यात नेहमीच सक्रिय असतात. गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया तसेच अन्य उपचार शासकीय योजनांद्वारे मोफत मिळवून देऊन ते रुग्णसेवा करत आहेत. नियुक्तीपत्रात पंडित आगा यांनी म्हटले आहे की पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचारानुसार आगामी काळात वैद्यकीय सेलच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि राज्यातील जनतेला आरोग्यसंबंधी असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आपण भरीव कार्य कराल. पक्ष संघटना मजबूती ने उभी कराल.

error: Content is protected !!