लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल
कणकवली (प्रतिनिधी) : आपचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आप चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्यासह 8 ते 10 जणांच्या जमावाने आज दुपारी कणकवली बुद्ध विहार येथे घोषणा देत निषेध केला.जमावबंदी आदेशाचे भंग केल्याप्रकरणी तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्यासह आदित्य बटवाले, मंगेश दळवी, मिलि मिश्रा ( कुडाळ,) प्रमोद जाधव तरंदळे, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर ( कणकवली ) शरद खरात ( कुडाळ ) आदींसह 8 ते 10 जणांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन सर्व राजकीय पक्षांनी करावे. जिल्ह्यात 144 कलम लागू असून जमावबंदी चे पालन सर्वांनी करावे असे आवाहन कणकवली पोलिस ठाण्याचे प्रभारी एपीआय मनोज पाटील यांनी केले आहे.












