आयुष नाळे व वेदांत सरकटे दोन्ही विद्यार्थी राज्यात दुसऱ्या तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर
वैभववाडी (प्रतिनिधी) : ११ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या आरटीएसई या परीक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी च्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर यशस्वी झेप घेत घवघवित यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेल्या कु.आयुष प्रदिप नाळे व कु.वेदांत विनोद सरकटे या दोन्ही विद्यार्थ्यांनी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला आहे. तर ओम निलेश शिंदे याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या उत्तुंग यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी अभिनंदन केले तर प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला.
यावेळी मुख्याध्यापक बी.एस.नादकर, पर्यवेक्षक पी. एम.पाटील, एस.बी.शिंदे. वर्ग शिक्षिका एस.ए.सबनिस इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.












