फाेंडाघाट (प्रतिनिधी) : राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्ष पदवीच्या वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनी फोंडाघाट बाजारपेठेत भर दुपारी प्रत्येक व्यावसायिकाच्या दुकानी जाऊन दूध व दुग्ध पदार्थ प्रक्रिया विभागांतर्गत रुचकर- स्वादिष्ट आणि थंडावा देणारी लस्सीची विक्री करून स्वावलंबातून शिक्षण आणि शिक्षणातून आणि नफा कमावण्याचे प्रात्यक्षिक प्रदर्शित केले. या उपक्रमाला बाजारपेठेतील दुकानदार, तेथील ग्राहक आणि ग्रामस्थ यांनी प्रतिसाद देत उपक्रमाचे कौतुक केले. या मध्ये तृशाल त्रिकुटे, तेजस त्रिकुटे, साहिल पाटील, सिद्धेश जोशी, नयन वळवी, नितीन वंजारा,विशाल शिंदे, ऐश्वर्या ठाकूर, वैष्णवी शेटे यांनी सहभाग घेतला. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी,समन्वयक यांचे मार्गदर्शन लाभले.
मराठे कृषी कॉलेजमधील चतुर्थ वर्ष पदवी विद्यार्थी- विद्यार्थिनींचा अभिनव उपक्रम !












