फोंडाघाट (प्रतिनिधी) : परंपरागत कृषी विकास योजना ( सेंद्रिय शेती ) अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर जीवामृत व बिजामृत निर्मिती आणि वापर याकरिता,फोंडाघाट पंचक्रोशीतील शेतकरी गटातील लाभार्थ्यांना, ड्रम- कल्चर इत्यादी प्रदान करण्यात आले.यावेळी हवेलीनगर येथील लाभार्थ्यांसह आबू पटेल आणि तृप्ती सावंत आदी उपस्थित होते.












