200 पैकी 120 गुणांसह पटकावले ब्रॉंझ मेडल
कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत फोंडाघाट सुतारवाडी शाळेतील तिसरी तील विद्यार्थिनी वेदिका हेमंत फोंडेकर हिने 200 पैकी 120 गुण मिळवत ब्रॉंझ मेडल ची मानकरी ठरली आहे. वेदिका हिला मुख्याध्यापक संजय सावंत, सहाय्यक शिक्षिका श्रीमती हुंबे, कडुलकर, ठाणेकर यांचे तसेच वडील हेमंत व आईचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल वेदिका हिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.












