आरे गावातील प्रताप कदम यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील आरे देवीचीवाडी येथील प्रताप उर्फ बाळा सखाराम कदम(वय६९) यांचे सोमवारी निधन झाले.मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजात आपला एक वेगळा ठसा उमटविला होता. पोस्ट खात्यांतर्गत विदेश डाक भवन, मुंबई येथे त्यांनी चांगली सेवा बजावली होती. विदेश डाकघर मधील भारतीय डाक कर्मचारी संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. कुशल संघटक असल्याने त्यांनी संघटनेची अन्य पदेही भूषविली होती.पोस्ट खात्यात त्यांनी अनेक तरुणांना नोकरीला लावले होते. आरे येथील श्री पावणादेवी तरुण सहाय्यक मंडळ,मुंबईचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चांगले काम केले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, चार भाऊ, भावजय,पुतणे,पुतणी असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कदम यांचे ते बंधू तर संदीप कदम यांचे ते चुलत बंधू होत.

error: Content is protected !!