चौके (अमोल गोसावी) : वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे शिक्षक एकनाथ राऊळ यांनी 2 महिन्याच्या खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना NCC मधील मानाचे 3rd ऑफिसर रँक प्राप्त झाली आहे असे प्रशिक्षण घेऊन कमिशन मिळवणारे जिल्ह्यातील मोजक्या शिक्षकांत पाहिले शिक्षक ठरले आहेत.
याप्रसंगी संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी राऊळ यांचे यासाठी विशेष कौतुक करतांना ” तुमच्या मार्गदर्शनाखाली आर.डी. परेड आणि रायफल शूटिंग यात आपल्या शाळेचे विद्यार्थी विशेष प्रावीण्य प्राप्त करतील” अश्या अपेक्षा व्यक्त केल्या.
राऊळ यांनीही माझ्या प्रशिक्षणाचा फायदा नक्कीच माझ्या विद्यार्थ्यांना होईल आणि विद्यार्थी नक्की चमक दाखवतील असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान आज कट्टा पंचक्रोशी शि. प्र. मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर आणि उपाध्यक्ष आनंद वराडकर यांच्या हस्ते एकनाथ राऊळ यांना शाल, बुके आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी सचिव, सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, खजानीस रवींद्रनाथ पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर, सौ. स्वाती वराडकर, मुख्याध्यापक संजय नाईक, कमलाकर हाडये, संदेश वाईरकर उपस्थित होते. संस्था विश्वस्त निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर आणि एस एस पवार यांनी राऊळ यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.











