सौ.संपदा सुर्वे,अमृता मयेकर, सुशिला सावंत,उषा किर्डकुडे, सविता भोसले,अनिता इंगळे या कतृत्ववान महिलांना अँवाँर्ड आँफ अँप्रिशिएशन पुरस्कार प्रदान
खारेपाटण (प्रतिनिधी) : ठाणे पुर्व येथील विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने नुकतेच जीवनात अहोरात्र संघर्ष करून स्वतःसह इतरांचे जीवन घडविणाऱ्या, जीवन सुखी आणि आनंददायी करणाऱ्या सावित्रीच्या लेकींच्या पाठीवर पुरस्कार रूपी शाबासकीची थाप देत नुकताच त्यांचा संघटनेच्या वतीने यथोचित्त सन्मान करण्यात संघटनेच्या वतीने संपदा साबाजी सुर्वे (जीवन आनंद संस्थेत रस्त्यावरील निराधारांसाठी सामाजिक कार्य) अमृता जगदिश मयेकर (युनायटेड स्पोर्टस क्लब ठाणे च्या प्राथमिक शाळा मुख्याध्यापीका) सुशिला काशिनाथ सावंत (घरकाम सेवक व शिपाई म्हणून काम करणारी महिला),उषा सतिष किर्दकुडे (पोस्ट वुमन), सविता सुनिल भोसले (रिक्षा ड्राईव्हर), अनिता तानाजी इंगळे (युनायटेड स्पोर्टस क्लब शिशु विकास मंदिर ठाणे येथे मुख्याध्यापिका ) या कतृत्ववान महिलांना अँवाँर्ड आँफ अँप्रिशिएशन पुरस्काराने प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
महिला दिनाच्या निमित्ताने रोजच्या धावपळीच्या जीवनात सतत संघर्ष करीत स्वतःचे , कुटुंबाचे व समाजातील जीवन घडविणा-या आणि आपल्या उल्लेखनिय कार्याद्वारे कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते अँवाँर्ड आँफ एप्रिशिएशन पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात आले. कतृत्ववान महिला भगीनींच्या या सन्मान कार्यक्रम संयोजनात विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत कोळेकर, उपाध्यक्ष पांडुरंग शिर्के आणि विकास कणेकर यांची महत्वाची भुमिका राहिली.तर विरंगुळा जेष्ठ नागरिक संघटनेच्या पंडित व झेलम इनामदार या सभासदांनी यावेळी कराओके संगीतावर जुन्या जमान्यातील अर्थपुर्ण अशी सुरेल गाणी गावून धमाल केली.
अरूणाताई जगियासी यांनी सर्वही सहा महिलांची भेट घेवून पुरस्कारासाठी त्यांची माहिती सादर केली. पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या महिला या सर्वसामान्य कुटुंबांतील असामान्य कर्तुत्व असलेल्या महिला आहेत. कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्या मान.डाँ.नैना सुर्यकांत लोखंडे, सहाय्यक शिक्षिका- डि.एस हायस्कूल सायन यांनी जीवन कौशल्या विषयी उपस्थीतांना सुंदर मार्गदर्शन केले.




















