यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन
वैभववाडी (प्रतिनिधी) : नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी मधील पाच विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यातील कु.आयुष नाळे, कु.वेदांत सरकटे, कु.शौर्य बोडेकर, कु.तनिष्का बुराण या चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे व मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी यशस्वी विद्यार्थी व वर्गशिक्षिका एस.ए.सबनिस यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, माध्यमिक विभाग प्रमुख एस.एस. पाटील, एस.ए.सबनिस, कनिष्ठ लिपिक टी.एल .बावदाणे व प्रशालेचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.












