युवा संदेश’च्या एसटीएस परीक्षेत चिंदर कुंभारवाडी शाळेचे यश !
विराज कांबळे, गंधर्व चिंदरकर यांना गोल्ड मेडल
आचरा (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च ( एसटीएस ) परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. या परीक्षेत जिल्हा परिषद शाळा चिंदर कुंभारवाडी शाळेच्या कु. रेणू भीमाशंकर शेतसंदी हिने 89% गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत 19 व्या क्रमांकांवर झेप घेत परत एकदा गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. काही दिवसापूर्वी कु. रेणू शेतसंदी हिने बीडीएस परीक्षेत गोल्ड मेडलसह राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. तसेच 4 थी इयत्तेतील कु. श्रेयस राजेंद्र चौधरी याने 84% गुण प्राप्त करत जिल्हा गुणवत्ता यादीत 28 वा क्रमांक प्राप्त केला आहे.
याच बरोबर इयत्ता 2 री तील कु. विराज सचिन कांबळे 79% व इयत्ता 3 री मधील गंधर्व नारायण चिंदरकर याने 84% गुण मिळवत गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. कु. अस्मिता राजेंद्र चिंदरकर, कु. सलोनी अमोल पारकर यांनी यश संपादन केले आहे. शाळेतील 6 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्या पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत निकाल 100% लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, शिक्षक भीमाशंकर शेतसंदी, राजेंद्र चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशा बद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण चिंदरकर, शा. व्य. समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.













