आय टी एस परीक्षेत खारेपाटण केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश

स्वयंम हर्षल पोरे तळेरे प्रभागात प्रथम

खारेपाटण (प्रतिनिधी) : प्राथमिक शाळा स्तरावर नुकत्याच घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट सर्च (आय टी एस) स्पर्धा परीक्षेत कणकवली तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवित यश संपादन केले असून या शाळेतील इयत्ता १ ली मध्ये शिकणारा विद्यार्थी कु.स्वयंम हर्षल पोरे याने तळेरे परीक्षा केंद्रात तसेच प्रभागात १५८ गुण मिळवीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांकरीता शैशणिक वर्ष सन -२०२३ – २४ घेण्यात आलेल्या या आय टी एस स्पर्धा परीक्षेत खारेपाटण जि.प.केंद्र शाळा क्र.१ चे एकूण ७ विद्यार्थी बसले होते.हे सर्व विद्यार्थी चागल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल १००% लागला आहे.या परीक्षेत यश प्राप्त केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे हर्षल स्वयंम पोरे (प्रथम क्रमांक), चिरायू मिथुन शेंगाळे,काव्या ज्ञानेश्वर कासार,प्रणिका गणेश कडकोळ,प्रेम गणेश कडकोळ,कु. राधिका निलेश करांडे, शुभ्रा सिद्धेश करांडे या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका आरती जेजोन व शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.
आय टी एस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी माजी अध्यक्ष संतोष पाटणकर,सौ गौरी शिंदे,उपाध्यक्ष आण्णा तेली माता पालक संघाच्या उपाध्यक्ष प्रियंका गुरव,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!