देश महासत्ता बनण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपाचा उमेदवार निवडून द्या – केंद्रीय मंत्री नारायण राणे

ओरोस फाटा येथे भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न

ओराेस (प्रतिनिधी) : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा आहे. ४४ वर्षात प्रथमच कमळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढली जाणार आहे. या निवडणुकीचे गांभीर्य बाळगा. ही सर्वसाधारण निवडणूक नाही. देशाला वाचविण्यासाठी निवडणूक आहे. देश महासत्ता बनण्यासाठी वेग वाढविण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी ओरोस येथील भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना केले.

ओरोस फाटा येथील ईच्छापूर्ती मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या ओरोस जिल्हा परिषद मतदारसंघ कार्यकर्ता संवाद या सभेला भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संदीप कुडतरकर, महिला प्रदेश सदस्य संध्या तेरसे, राजू राऊळ, महिला अध्यक्षा सुप्रिया वालावलकर, राजू राऊळ, ओरोस बुद्रुक सरपंच सरपंच आशा मुरमुरे, कसाल सरपंच राजन परब, रानबांबुळी परशुराम परब यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पडवे गावच्या उपसरपंच रूनाली परब यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मंत्री राणे यांनी त्यांचे स्वागत केले.

error: Content is protected !!