बाजारपेठेत फिरणारी मोकाट गुरे आणि वारंवार – तासन् तास होणारा वाहतूक खोळंबा यावर कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे — नागरिकांची मागणी.
आरटीओ- पोलीस आणि ग्रामपंचायतीने कठोर होण्याची गरज
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजन नान, हे सकाळी घराकडून बाजारपेठेकडे आपल्या मोटर सायकलने येत असताना, मारुती वाडी येथे बैल अचानक आडवा आल्याने गाडीला धडक बसली.आणि ते कोसळले .त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसला. डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. अपघात एवढा जोरदार होता की डोक्यातून वाहणाऱ्या रक्तप्रवाहमुळे रस्त्यावर रक्ताचे चाकोळे पसरले. हे कळताच मित्रपरिवारांनी तातडीने त्यांना कणकवली येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. त्यांची तब्येत विषयी पुढील चाचण्या झाल्यावर नेमकी औषधोपचाराची दिशा ठरवण्यात येईल. मात्र प्रथमोपचारांना राजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. ह्या अपघातानंतर मित्र परिवारातील सर्वांनी कणकवली येथील खाजगी रुग्णालयात धाव घेऊन, राजन यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
मागील ग्रामपंचायत मासिक मीटिंगमध्ये बाजारपेठेत गावात मोकाट फिरणाऱ्या गुरांचा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते भाई हळदिवे यांनी जोरदारपणे मांडला होता. मात्र यावर गदारोळ होऊन सक्षम पर्याय किंवा ठोस निर्णय होऊ शकला नाही. अशा अपघातामुळे हा प्रश्न गावात गंभीर होत आहे.त्यामुळे याकडे ग्रामपंचायतीने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात मोठ्या अपघातात जीवित हानी होण्याची शक्यता आहे.
अपघात झाला त्यावेळी रस्ता रुंदीकरणानंतर प्रत्येक दुकानदाराच्या दरवाजात उभ्या केलेल्या दुचाकी चार चाकी वाहनांमुळे रस्त्यावरची वाहतूक खंडित होते.अशावेळी गंभीर अपघातात जखमी झालेल्या राजन नांनचे यांना रुग्णालयात नेताना, प्रत्येक मित्र परिवारानी ओरडून वाहतूक बाजूला करण्याचे आवाहन केले जात होते. हे दृश्य एखाद्या पेशंटसाठी जीवन-मरणाचे हृदय द्रावक होते. त्यामुळे बाजारपेठेतील रुंदीकरण वाहतूक खंडित होऊ नये ? म्हणून केले की प्रत्येकाच्या दरवाज्यात पार्किंग झोन करण्यासाठी ? असा संतप्त सवाल ग्रामस्थ नागरिकांमधून विचारला जात आहे.यावर पोलीस आणि ट्राफिक पोलीस यांनी कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे.यासाठी ग्रामपंचायतीने सक्षम पाऊल उचलावे असे आवाहन ग्रामस्थांतर्फे विश्वनाथ जाधव आणि मित्रपरिवारांनी केले आहे.












