ब्रह्मनगरी-फोंडाघाट मधील गुढीपाडवा आणि नववर्षाचं आगळं वेगळं स्वागत

लोप पावत चाललेल्या “आग-गोळे” लोककला चे साहसी प्रात्यक्षिक कौतुकास्पद !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याचा पारंपारिक सण प्रत्येक घरोघरी साजरा होत असताना, आजच्या प्रवाहानुरूप फोंडाघाट- ब्रह्मनगरी येथे नव वर्षाचे स्वागत आणि जल्लोष शोभायात्रेतून दिसून आला. आपल्या भारतीय संस्कृतीचा- परंपरेचा वारसा पुढील पिढीकडे देण्याचा स्तुत्य मानस आणि त्यास ब्रह्मनगरीतील नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त सहभाग, यामुळे पहिल्याच वर्षी हा सोहळा देखणा आणि लक्षणीय ठरला…

या शोभायात्रेत ब्रह्मनगरी मधील सर्व वयोगटातील महिला ढोलपथक आणि लेझीमपथक, तसेच त्यावर पारंपारिक वेशभूषेत थिरकणारी युवाई हे प्रमुख आकर्षण होते. तर चित्ररथामध्ये बाल कलाकारांनी साकारलेल्या वेशभूषेमध्ये विठ्ठल- रखुमाई,जानकी, राम- लक्ष्मण- सीता- हनुमान आणि विशेष गोरोबाकाकांची व्यक्तिरेखा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. पारंपारिक लाठीकाठी चे साहसी खेळ सर्वांच्याच कौतुकास पात्र होते. संध्याछाया आणि रात्रीच्या संधी प्रकाशात सादर केलेले, आगी च्या गोळ्यांचे खेळ साहसी तसेच चपलतेचे दर्शन सर्वांनाच रोमांचकारी ठरले. यामध्ये १४ वर्षापासून ८० वर्षापर्यंत अबाल वृद्ध आणि मुली- महिलांनी सहभाग घेतला. विविध कलागुण, सौंदर्य आणि विविध पारंपारिक वेशभूषेमधील या शोभायात्रेची सांगता रात्री नऊ वाजता ब्राह्मणश्वर मंदिरात मराठी नववर्षाचे स्वागत करून संपन्न झाली. याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!