फोंडाघाटचे संजय सावंत-पटेल यांना देवाज्ञा !

शिवसेना नेते संदेश पटेल यांना भातृशोक !

मित्रांचा मदतनीस आणि हरहुन्नरी खेळाडू हरपला ! मित्र परिवाराची श्रद्धांजली

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट बाजारपेठेतील नागरीक संजय पांडुरंग सावंत – पटेल (६१ वर्षे) यांचे मंगळवारी दुपारी राहत्या घरी दुःखद निधन झाले. गेले काही दिवस ते विविध आजारांसाठी उपचार घेत होते. फोंडाघाट एस टी स्टँड समोरील हनुमान गुड ट्रान्सपोर्ट द्वारे चालक वाहकांना ते सेवा पुरवीत होते.अडचणीत असलेल्या मित्रांना मदत कार्यात ते सदैव पुढे असत. हेल्थ अकॅडमीचे ते सदस्य आणि गावच्या विकास कार्यात नेहमी सकारात्मक राहत. स्टॅंडवरील कट्ट्यावर मदतनीस, सहकऱ्यांचा सच्चा मित्र आणि हरहुन्नरी खेळाडू हरपल्याची भावना, त्यांच्या मित्रपरिवारातून व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी- मुलगा- विवाहित मुलगी- बहिणी-जावई- नातवंडे असा मोठा परिवार आहे. संजय हे शिवसेना नेते संदेश सावंत- पटेल यांचे बंधू तर माजी सरपंच स्व. काका पटेल यांचे सुपुत्र होत.त्यांच्यावर सायंकाळी पटेलवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या मित्र परिवारासह आप्तेष्ट, स्थानिक नेत्यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.त्यांच्या निधनाबद्दल पंचक्रोशीत दुःख व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!