“संविधान भारतीय जनतेचे संरक्षण करते;आता मात्र संविधानाचे संरक्षण जनतेनी करण्याची वेळ”- संदीप सरवणकर

वैभववाडी (प्रतिनिधी) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती देशभर साजरी करत असताना , परमपूज्य बाबासाहेबांनी ह्या देशातील दुर्बल घटकांना न्याय मिळावा, त्याचे हककाचे संरक्षण व्हावे.म्हणून देशाची राज्य घटना लिहिली.आणि ती दुर्बल घटकाचे प्रतिनिधीनी लिहावी. ही त्यावेळी इंडियन काँग्रेस च्या सर्वच नेत्यांची धारणा होती.कारण ,समाजाचे अंतिम लोकांचे हकक शाबूत ठेवताना, त्यांचे विचार मांडणारा प्रतिनिधीच्या तारतम्य बुद्धीने ते व्हावे , ही प्रामाणिक मनोकामना  ही त्या मागे होती. खरतर,   स्वतंत्र भारताचे राज्यात दलितांना , अल्पसंख्यांक , महिला , अबालवृद्ध, दिव्यांग यांना त्याचा ठोस आधार  मिळावा  , ही प्रेरणा ही त्यात होती .               परंतु, निधर्मी व समाजवाद हा मुळगाभा असलेली ही राज्य घटना कधीही राज्य सत्ता मिळाली तरी कायम टिकवू देणारी नाही. असा , त्यातून काही विघटनवादी राज्यकर्त्यांनी   अंदाज घेऊन, ही राज्यघटना कशी अघटीत आहे ?, असा  अप्रचार त्यांचे कडून केला जाऊ लागला आहे. आणि ह्या राज्य घटनेला आता कालबाह्य ठरवून , आपल्या सोयीची अशी ती बनवावी.म्हणून संसदेत घटना दुरस्ती साठी आवश्यक आपले निर्विवाद मताधिक्य आणावे ह्या साठी साम, दाम, दंड, भेद ह्या नीतीचा अवलंब केलाही जाईल असे चित्र ही आता दिसू लागले आहे. परंतु, जनतेनी आताच  सावध राहून, येणारी निवडणुकीत संविधान विरोधी लोकांचा बीमोड करण्यासाठी एकत्र आले पाहिजे.म्हणजे जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या घटनेची दुर्घटना होऊ नये म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी आता जनतेने संविधानात्मक मार्गाने घेऊन,  म्हणजे येणारे निवडणुकीत योग्य चिन्हावर बोट दाबून क्रांती-ज्योत मशाल  पेटवावी. ही काळाची गरज आहे.आणि तीच डॉ.बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरणारी आहे .

error: Content is protected !!