डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत सोहम लोकरे प्रथम

खारेपाटण बुद्धविहार येथे विद्यार्थ्यांचा गौरव

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त प्राथमिक स्तरीय शालेय विद्यार्थ्यांना करीता घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या स्पर्धेत जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ चा विद्यार्थी कु.सोहम संतोष लोकरे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला.तर उर्वरित अनुक्रमे गुणवंत सर्व विद्यार्थ्यांचा आज पंचशील नगर खारेपाटण येथील बुद्ध विहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी रोख रकमेची पारितोषिके व प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

ही सामान्य ज्ञान स्पर्धा जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे इयत्ता ४ थी ७ वी या शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली होती.एकूण ६० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सोहम संतोष लोकरे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला.व द्वितीय क्रमांक सर्वेश नाडगौडा तर तृतीय क्रमांक कु.सांची संतोष पाटणकर तसेच उत्तेजनार्थ म्हणून कु.अन्वी निशिकांत शिंदे व कु.सुकन्या दिनेश पाटणकर यांनी यश संपादन केले.या सर्व विद्यार्थ्यांचे पंचशील विकास मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर,मुंबई मंडळाचे कार्यकर्ते बबलू पाटणकर,ग्रामीण मंडळाचे कार्यकर्ते जितेंद्र कदम, संदीप पाटणकर,संतोष जुवाटकर, अशोक पाटणकर,सागर पोमेडकर, सिद्धेश पाटणकर प्रथमेश कदम, धीरज जुमलेकर जेष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर,प्रकाश हेटम आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!