भारतीय संविधान जगातील सर्वोत्तम संविधान आहे – महेंद्र मोरे

वैभववाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे व सर्वोत्तम संविधान आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला आहे. भारतासारख्या अनेक जाती धर्म पंत,भौगोलिक विविधता असलेल्या महाकाय देशाला एक संघ ठेवण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे. असे प्रतिपादन महेंद्र मोरे यांनी केले.

वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मोरे बोलत होते.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, सचिव रवींद्र पवार,महिला अध्यक्ष शारदा कांबळे, सचिव रुचिता कदम, महेश पेडणेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोरे पुढे म्हणाले,भारतीय संविधान हे धर्म निरपेक्ष आहे. प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य आहे.ज्या देशाने धर्माधिष्ठित राष्ट्र केली. त्यांची अवस्था काय झाली आहे. ते आपण पाहत आहोत. बाबासाहेबानी शिक्षणाला खूप महत्वाचे स्थान दिले आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ते प्राशन केलेला माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकानी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे असे मोरे यांनी सांगितले. यावेळी महेश पेडणेकर, अध्यक्ष भास्कर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ.आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.  तालुकासंघांचे बौद्धचार्य संतोष कदम, महेंद्र यादव,मंगेश कांबळे, सुरेंद्र यादव, विश्वास पेडणेकर, अभय कांबळे यांनी विधी संचलन केले.त्यानंतर स्मारक ते मच्छिमार्केट अशी भव्य धम्म रॅली काढण्यात आली. या रॅलीत हजारोंच्या संख्येने अबालवृद्ध सहभागी झाले होते. महामानवांच्या नावाच्या जयघोषाने परिसर दानानून सोडला. कार्यक्रमाची प्रस्तावना रवींद्र पवार, सूत्रसंचलन व आभार शरद कांबळे यांनी मानले. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे,प्रफुल्ल जाधव,रूपेश कांबळे,अजित कदम,राहूल जाधव,भालचंद्र

error: Content is protected !!