कणकवली तालुक्यातील सावडाव येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख अशोक विठोबा वारंग यांचा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावडाव येथील उबाठा गटाचे शाखाप्रमुख अशोक विठोबा वारंग यांनी आज कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेशजी राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सावडाव गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेशजी राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेशजी राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन अशोक वारंग यांनी हा प्रवेश केला. यावेळी संदीप सावंत, दत्ता काटे उपसरपंच सावडाव, संजय झगडे, अनंत जाधव, भाई आंबेरकर आदि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.












