” बौद्ध धम्म ही मानवी विकासाची प्रक्रिया आहे ” – धम्मचारी अमोघसागर
खारेपाटण (प्रतिनिधी) : १४ एप्रिल हा आजचा आनंदी दिवस प्रत्येक बांधवाने संकल्प करण्याचा दीन आहे. तर बौद्ध धम्म हा मानवी विकासाची अखंड चालणारी प्रक्रिया असल्याचे भावपूर्ण उदगार धम्मचारी अमोघसागर, खेड यांनी खारेपाटण पंचशील नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती कार्यक्रमात समजा बांधवांना मार्गदर्शन करताना काढले.
पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती पंचशील नगर,खारेपाटण येथील बुद्धविहार विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. प्रारंभी पंचशील ध्वजारोहण करून येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला स्थानिक मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र कदम व संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा आंकांशा पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले. यावेळी बौध्दचार्य संतोष मधुकर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक बौद्ध धम्म पूजा पाठ येथील बुद्ध विहारात घेण्यात आला. यामध्ये सर्व महीला – पुरुष,युवक – युवती,अबाल – वृद्ध यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी. कांबळे,खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर,सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव,ग्रा.पं.सदस्य किरण कर्ले,जयदीप देसाई,सुधाकर ढेकणे, शितिजा धुमाळे,अमिषा गुरव, दक्षता सुतार,प्रणय गुरसाळे तसेच बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण मुंबई संघटनेचे सचिव व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे,ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे सचिव – सचिन कोर्लेकर,सागर पोमेडकर, दीपक जाधव, सत्यवान जाधव यांनी सदिच्छा भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्राथमिक स्तरावरील शालेय विद्यार्थ्यांकरीता घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मुंबई मंडळाचे कार्यकर्ते बबलू पाटणकर,आरोग्य सेवक संतोष जुवाटकर,जेष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर,प्रकाश हेटम, अशोक पाटणकर यांच्या शुभहस्ते घेण्यात आला.यावेळी सरपंच प्राची इसवलकर,सचिन कोर्लेकर,मंगेश गुरव यांनी जयंती कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.खारेपाटण पंचशील नगर येथील युवकांच्या वतीने खारेपाटण बुद्धविहार ते नव्याने उभारण्यात आलेल्या राजापुर येथील आंबेडकर भवन स्मारका पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली.यामध्ये महिला भगिनीचा देखील समावेश होता.तर सायंकाळी मुंबई येथील प्रसिद्ध जादूगार पांचाळ भरत नाईक यांच्या टीमने जादूचे प्रायोग सादरीकरण केले.याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.तसेच स्थानिक मुलांचे विविध फनिगेम यावेळी मंडळाच्या वतीने घेण्यात आले.
तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त येथील बुद्धविहारात आयोजित करण्यात आलेल्या धम्म प्रवचन कार्यक्रमाला खेड,रत्नागिरी येथील धम्मचारी – अमोघसागर,धम्ममित्र अजय तांबे,धम्म युवा उपासक प्रशिल तांबे यांनी उपस्थित राहून बौद्ध उपसाक – उपासिका याना अनमोल असे मार्गदर्शन केले.” “आपल्यातील संकुचित विचार करण्याची वृती आपण बदलली पाहिजे.व राष्ट्र बंधूभाव जोपासला पाहिजे.याबरोबरच आपल्या देशाला महासत्ता बनवायचे असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन देखील यावेळी धमचारी अमोघ सागर यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार मंडळाचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर यांनी मानले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते संदीप पाटणकर,धीरज जुमलेकर, सिद्धेश पाटणकर प्रथमेश कदम, विराज पाटणकर,भूषण गोवळकर, मकरंद पाटणकर,आशिष पोमेडकर बाळकृष्ण पाटणकर,अमित पाटणकर,श्रवण पाटणकर,पार्थिव पाटणकर,ललित पाटणकर,राहुल पाटणकर,संदेश पाटणकर,भरत पाटणकर,आदीचे सहकार्य लाभले.























