आचरा (प्रतिनिधी) : ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या देवगड तालुका संघटकपदी श्रीकृष्ण दुधवडकर यांची निवड करण्यात आली. संघटनेची सर्वसाधारण सभा देवगड येथे टिळक भवन या ठिकाणी संपन्न झाली. श्रीकृष्ण दुधवडकर यांना संघटनेचे नियुक्तीपत्र व ओळखपत्र राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर यांच्या हस्ते देण्यात आले.
त्यावेळी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष योगेश मस्के, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंदार काणे, मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, संगमेश्वर तालुकाध्यक्ष पंढरीनाथ मोहिरे, मालवण तालुका उपाध्यक्ष प्रमोद कांडरकर, कणकवली तालुका संघटक तथा स्पेक्टो मार्टचे संचालक मंगेश चव्हाण, तसेच देवगड तालुका अध्यक्ष सौ. ज्योती जयदीप जाधव, सदस्य सौ.दिपाली आयरे, मालवण तालुका सदस्य श्री.आचरेकर, सुरेखा जोशी, सौ.गुरव तसेच देवगड तालुक्यातील महिला मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होत्या. श्रीकृष्ण दुधवडकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.













