जिल्ह्यात ४ मे पर्यंत मनाई आदेश – जिल्हाधिकारी तावडे

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ४ मे पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. आगामी काळात महावीर जयंती, हनुमान जयंती, महाराष्ट्र दिन, कामगार दिन या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी हे मनाई आदेश लागू करण्यात आले आहे.

error: Content is protected !!