म.रा.प्रा.शिक्षक समिती शाखा कणकवली चा वार्षिक दत्तक व गुणवंत विद्यार्थी,शिक्षक सोहळा संपन्न…

“नवीन संच मान्यतेच्या विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार” – राजन कोरगावकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : नवीन संच मान्यतेचे निकष हे गोरगरीब मुलांचे भवितव्य अंधकारमय करणारे व शिक्षणापासून दूर ठेवणारे असे आहेत.या निर्णयाच्या विरोधात म.रा. प्रा.शिक्षक समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे भावपूर्ण उदगार तथा इशारा म.रा. प्रा.शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर

यांनी कणकवली येथे तालुका शाखा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दत्तक विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना काढले.कणकवली महिला आघाडी अध्यक्षा सौ नेहा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,जिल्हा सचिव तुषार आरोसकरराज्य कार्यकारणी सदस्य दादा जांभवडेकर,जेष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर,भाई चव्हाण शिक्षक नेत्यासुरेखा कदम,उपाध्यक्ष रुपेश गरुड,धीरज हुंबे,जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कुडाळकर,माजी जिल्हा अध्यक्ष नंदकुमार राणे,माजी जिल्हा सचिव सचिन मदने,जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष निकिता ठाकूर,सचिव – वैभवी कसालकर,शिक्षक पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक,संचालक संतोष मोरे,मंगेश कांबळी,चंद्रसेन पाताडे,विजय सावंत,श्रीकृष्ण कांबळी,ऋतुजा जंगले,महेश पावसकर,कुडाळ अध्यक्ष शशांक आटक,मालवण अध्यक्ष राजेंद्रप्रसाद गाड, वैभववाडी अध्यक्ष रफिक बोबडे,देवगड अध्यक्ष जयेंद्र चव्हाण, प्रशांत झालबा,जीवन हजारे,महादेव शेट्ये,महेश काळे,विनिता शिरसाट आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला कणकवली तालुक्यातील २२ केंद्रातील २२ गरजू विद्यार्थ्यांना सुमारे दीड हजार रुपये किमतीचे शैशणिक साहित्य वाटप करण्यात आले.तसेच इयत्ता ५ वी ते ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या १३ विद्यार्थ्यांचा शैशणिक साहित्य भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच इयत्ता ४ थी व ७ वी मधील ए पी जे अब्दुल कलाम परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या एकूण ६ विद्यार्थ्यांचा तर नवोदय विद्यालय केंद्रीय स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या ५ विद्यार्थ्यांचा शैशणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या वतीने शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये कणकवली तालुक्यातून अनुक्रमे १ ते १० क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील यावेळी शिक्षक समितीच्या वतीने शैशणिक साहित्य व प्रशस्तीपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

जिल्हास्तरीय ज्ञानी मी होणार महोत्सवात हरकुळ खुर्द गावडेवाडी शाळेच्या कु.अर्णव राजाराम भिसे व संचित समिर सावंत या विद्यार्थ्यांचा शैशणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला.तसेच शैशणिक शेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कणकवली तालुक्यातील सुशांत मर्गज,सौ ऋतुजा चव्हाण,विद्याधर पाटील यांचा शाल,सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.तसेच कणकवली तालुक्यांतील चालू वर्षात सेवानिवृत्त झालेल्या व संघटनेचे सभासद असलेल्या शिक्षक सुजाता टिकले,शर्मिला कदम, शुभलक्ष्मी कुलकर्णी,प्रियंका सावंत, सुनीता मुसळे,रेश्मा दांडेकर,श्रद्धा हजारे,शुभांगी सावंत,सुजाता साटवीलकर अरुण पंडित, श्रीकृष्ण बोभाटे आदींचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत जिल्हा व कणकवली तालुक्यात अनुक्रमे प्रथम आलेल्या शाळांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर परसबाग उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील जिल्ह्यात द्वितीय आलेल्या शाळेचा तसेच प्राथमिक शिक्षक पतपेढीवर संचालक म्हणून निवडून आलेल्या शिक्षकांचा विशेष सत्कार यावेळी समितीच्या वतीने करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तक विद्यार्थी समिती सदस्य संतोष कुडाळकर,अजय तांबे यांनी मेहनत घेतली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत मर्गज व रश्मी आंगणे यांनी केले.तर आभार प्रदर्शन अजय तांबे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!