महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ आनंदराव अडसुळ सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ माजी खासदार तसेच को-ऑप बँक एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्ग चे अध्यक्ष आनंदराव अडसूळ शनिवारपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून कणकवली येथील मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या प्रचार सभेस उपस्थित राहणार आहेत.तसेच शनिवारी सायंकाळी ५.३०वाजता कुडाळ येथील हॉटेल कोकण स्पाईस येथे युनियनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य यांची एकत्रित सभा आयोजित करण्यात आली असून सदर सभेस ते मार्गदर्शन करणार आहेत.महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचंड मताधिक्याने विजयी होण्यासाठीआनंदराव अडसुळ सिंधदुर्ग जिल्ह्यात प्रचार दौरा करणार आहेत.

error: Content is protected !!