उद्धव ठाकरे यांचे कणकवलीत सभास्थळी आगमन

राणेंच्या होमपीचवर थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडणार

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कणकवलीत सभास्थळी आगमन झाले आहे. उद्धव ठाकरे यांचे सभास्थळी आगमन होताच कोण आला रे कोण आला …शिवसेनेचा वाघ आला…शिवसेना जिंदाबाद च्या घोषणांनी सभास्थळ दणाणून सोडण्यात आले.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी चे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर आयोजित करण्यात आली आहे.या सभेला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वानाच आहे. महायुती चे उमेदवार नारायण राणे यांच्या होमपीचवर ठाकरेंची तोफ विरोधकांचे वस्त्रहरण कोणत्या शब्दांत करतात याची सर्वानाच उत्सुकता आहे.

error: Content is protected !!