कदम दाम्पत्याचे लाईफ लाईन हेल्थ केअर लोकसेवेत दाखल

माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते झाले उदघाटन

ओरोस (प्रतिनिधी) : कसाल येथील उद्योजक संतोष कदम आणि त्यांच्या पत्नी डॉ श्रेया कदम यांनी सुरू केलेल्या लाईफ लाईन हेल्थ केअर या वैद्यकीय व्यवसायातील एक नव्या दालनाचे लोकार्पण माजी आमदार राजन तेली यांचे हस्ते पार पडले. कसाल सारख्या ग्रामीण भागात पण राष्ट्रीय महामार्गा लगत भौतिक परिस्थितीचा विचार करून मेडिकल स्टोअर, बरोबरच सौदर्य प्रसाधने, लहान मुलांचे आवश्यक आणि जीवनपयोगी वस्तू अशांनी समाविष्ट असलेले एक नवे दालन सुरू करण्याचा आणि त्याचा उपयोग ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकांना व्हावा हा त्यांचा हेतू आहे.

भविष्य काळात या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांच्या स्मृती असलेल्या कै. जयश्री नारायण कदम चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्र उभारून या भागातील गोरगरीब नागरिकांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा या माध्यमातून देण्याचा या कुटुंबाचा मानस आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,माजी जि प अध्यक्ष काका कुडाळकर,दयानंद चौधरी, नागेश मोरये, अशोक सावंत, आबा मुंज,अस्मिता बांदेकर,सरोज परब,सुमेधा पाताडे, सुप्रिया वालावलकर, कल्पिता मुंज,कसाल सरपंच राजन परब, उपसरपंच , डॉ सुर्यकांत बालम संजय मालंडकर, शेखर राणे रुपेश पावसकर ही मित्रमंडळी तसेच कसाल शिक्षण संस्था सचिव भाई सावंत,देवस्थान मानकरी यशवंत परब, बाळा मर्तल, विजय प्रभू, लीला अनावकर,मनसे नेते गणेश कदम,धीरज परब अमर सावंत,द्वारकानाथ घुरये,नवीन बांदेकर, संजय भोगटे,, भाई नार्वेकर, उदय जांभवडेकर,बाबा आंगणे, समीर परब, सचिन ओटवणेकर अरुण मालनकर, विवेक बालम, आपा हरमलक,चिराग बांदेकर,सुनील पावसकर डॉ मानसपुरे, डॉ संजय सावंत, डॉ कोलते, डॉ मोरये, डॉ बागवे, डॉ पवार,यशवर्धन राणे ॲड विलास परब पत्रकार मित्र उमेश तोरसकर, संतोष वायंगणकर, बाळ खडपकर,संदीप गावडे,विनोद परब तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तसेच दिवसभरात अनेक वेगवेगळ्या क्षेत्रीतील मान्यवर तसेच ग्रामस्थांनी भेट देत सदिच्छा दिल्या.

error: Content is protected !!