खारेपाटण येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न…
खारेपाटण (प्रतिनिधी) : भ. गौत्तम बुद्ध, छ. शिवाजी महाराज, म. ज्योतिबा फुले, छ. शाहू महाराज, डॉ. बाबसाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव निमित्त बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेच्या वतीने खारेपाटण पंचशील नगर येथे नुकतेच मोफत नेत्र तपासणी शिबिर संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
खारेपाटण पंचशील नगर अंगणवाडी केंद्र येथे संपन्न झालेल्या या नेत्र तपासणी शिबिराचा शुभारंभ खारेपाटण बुद्धविहार समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी नेत्र तज्ञ डॉ.सिद्धार्थ तांबे, बौद्धजन सेवा संघ १२ गाव संघटना खारेपाटण या संघटनेचे मुंबई शाखेचे माजी अध्यक्ष अशोक कांबळे, ग्रामीण संघटनेचे चिटणीस सचिन कोर्लेकर, ससामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, स्थानिक पंचशील विकास मंडळ खारेपाटण चे कार्यकर्ते संदीप पाटणकर, मनोज पाटणकर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या नेत्र तपासणी शिबिरा करीता उपस्थित राहिलेले डॉ.सिद्धार्थ तांबे यांचा खारेपाटण बौद्धजन सेवा संघ विभागाच्या वतीने चिटणीस सचिन कोर्लेकर यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी १२ गाव संघटनेचे कार्यकर्ते चिटणीस सागर पोमेडकर, महेंद्र कदम, दीपक पगारे, सत्यवान जाधव, दीपक जाधव आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
या मोफत नेत्र तपासणी शिबिरात १२ गाव संघतेनेतील सुमारे ५० जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेऊन त्याचा लाभ घेतला.या शिबिराला डॉ.सिद्धार्थ तांबे यांचे सहकार्य लाभले. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे चिटणीस सचिन कोर्लेकर यांनी केले व सर्वांचे आभार महेंद्र कदम यांनी मानले.















