दि.१३ आणि १४ मे २४ रोजी समस्त कासार न्याती बांधवांतर्फे विविध उपक्रम !
फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : फोंडाघाट बाविचेभाटले येथे श्री कालिकादेवी उत्कर्ष मंडळ, बावीचेभाटले तर्फे, सोमवार तारीख १३ मे आणि मंगळवार तारीख १४ मे रोजी श्री कालिका देवी मंदिर वर्धापन दिन उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहून, उत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष विठोबा येंडे, मा.अध्यक्ष-मुंबई मंडळ-रमेश तिवरेकर आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष तुकाराम तिवरेकर तसेच मंडळातर्फे करण्यात येत आहे …
सोमवार तारीख १३ मे रोजी सायंकाळी सहा वाजता- दीप प्रज्वलन, सात वाजता विविध स्पर्धा, रात्री नऊ वाजता- स्थानिक सुस्वर भजने. मंगळवार तारीख १४ मे रोजी सकाळी नऊ वाजता- देवीची अभिषेक- पूजा, सकाळी दहा वाजता- श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी बारा वाजता – महाआरती, दुपारी एक वाजता – महाप्रसाद, सायंकाळी ३:३० वाजता देवीची ओटी भरणे आणि महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ ! सायंकाळी सहा वाजता – सुस्वर भजने, रात्री सात वाजता – प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, रात्री सात तीस वाजता- बक्षीस वितरण आणि गुणगौरव सोहळा ! रात्री आठ वाजता- प्रमुख पाहुण्यांचे मनोगत ! रात्री नऊ वाजता- खुल्या राज्यस्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा ! असा दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.यासाठी श्री कालिकादेवी उत्कर्ष मंडळ सेवा मंडळ कार्यरत आहे. यावेळी समस्त कासार समाजातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री कालिकादेवी उत्कर्ष मंडळ बावीचेबाटले – फोंडाघाट यांनी केले आहे.











