तब्बल २६ वर्षांनी एकत्र आले १९९६-९७ मधील दहावीतील माजी विद्यार्थी


देवगड (प्रतिनिधी) : तब्बल २६ वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी! वाडा हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात शाळा आणि विदयार्थी यांचे नाते आईसमान असते, म्हणूनच शाळेला मातृत्व असेही संबोधले जाते. याच शाळेचे ऋणानुबंध टिकविण्यासाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करुन १९९६-९७ मधील वाडा हायस्कुलच्या माजी विदयार्थ्यांनी शाळेसाठी वॉटर क्युरीफायर भेट स्वरुपात दिला आहे.

शिक्षणामुळेच प्रत्येकजन हा पुढे जावून आपली प्रगती करीत असतो. प्रत्येक विदयार्थी हा आपल्या शाळेला मंदिरच मानत असतो आणि या ज्ञानाच्या मंदिरामुळेच प्रत्येक व्यक्ती हि घडत असते. वाडा हायस्कुलमध्ये मिळालेले आम्हाला शिक्षण त्यामधून झालेली प्रगती हि कधिही न विसरणारी आहे. यामुळे आईप्रमाणेच त्या शाळेचे व शिक्षकांचे स्थान हे कायम विदयार्थ्याच्या ऋदयात स्थान निर्माण केलेले असते. याच ऋणानुबंधातून वाडा येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कुल मधील १९९६-९७ च्या दहावीतील माजी विद्यार्थी २६ वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी जवळजवळ २६ वर्षांनंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

यावेळी प्रथम सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसेच हयात नसलेल्या कै. महेश जोशी, कै. जितेंद्र इंदुलकर, कै.निलेश पांचाळ, कै.शोभा गुरव, कै. प्रशांत जुवाटकर, कै. शरयु पुरळकर, या मित्र मैत्रिणीना भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.

या स्नेह मेळाव्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष सदानंद पवार, सचिव शंकर धुरी, दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक निरंजन दीक्षित, संस्था समन्वयक कुमार फडके, स्थनिक समितीचे अध्यक्ष सहदेव पुजारे, मुख्याध्यापक नारायण माने, शिक्षक दिनकर जोशी, उल्का जोशी, अनुराधा दीक्षित, मनोहर भगत, संभाजी जाधव, पवार आदी उपस्थित होते.

प्रत्येक विद्यार्थ्याने आपली ओळख करून देताना आपण सध्या काय करतो हे देखील सांगितले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील आठवणी सांगितल्या. कोणी पोलिस, कोणी पत्रकार, कोणी मुंबई, बाहेर गावी नोकरीला तर कोणी आंबा बागायतदार, दुकानदार अशी ओळख करून दिली.

शिक्षकांनी देखील २६ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांची प्रगती झालेली पाहून समाधान व्यक्त केले. संस्था पदाधिकाऱ्यांनी देखील मौलिक मार्गदर्शन करून शाळेचे ऋण लक्षात ठेवून शाळेला सहकार्याची भावना व्यक्त केली. सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी वॉटर क्युरीफायर भेट दिला. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना साधे, थंड व गरम पाणी देखील पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

माजी विद्यार्थ्यांमध्ये हर्षद जोशी, प्रशांत वाडेकर, विवेक वेलणकर, विवेक तावडे, शैलेश परब, नितीन पुरळकर, अयोध्याप्रसाद गांवकर, वैभव परब, निशांत कोयंडे, प्रवीण उपरकर, सतीश वाडेकर, प्रवीण बिर्जे, बाबाजी पुजारे, संतोष पुजारे, एकनाथ पुजारे, संतोष बिर्जे, सुजय पुजारी, निलेश वाडेकर, दीपक शिर्सेकर, सुमन गुरव, पुनम गुरव, वर्षा पांचाळ, भारती वाडेकर, संजीवनी जाधव,विभावरी कांबळे, दिपाली मेस्त्री, गीता मेस्त्री, कविता नर, वृंदा भाबल, परेश हिरनाईक, देवयानी भाबल, मंगेश तेली,स्वप्नील शिंदे, यांनी एकत्र येत दहावीच्या वर्गात बसून जून्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक वेलणकर याने तर प्रास्ताविक हर्षद जोशी याने केले.

error: Content is protected !!