३१ मे ते ४ जुन पर्यंत केरळ मध्ये दाखल होणार असल्याची शक्यता
वैभववाडी (प्रतिनिधी) : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारे आनंदवार्ता आहे. मान्सून वेगाने प्रवास करत काल रविवारी दुपारी ३ च्या सुमारास अंदमान निकोबार बेटांसह बंगाल च्या उपसागरात दाखल झाला आहे. ३१ मे ते ४ जुन पर्यंत तो केरळ मध्ये दाखल होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ३-४ दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले आहे.












