कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि शिर्डीचे साईबाबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. नायडू यांच्या दौऱ्यानिमित्त कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरातील चौक चौकात पोलीस तैनात होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मंदिर परिसरात पोलिसांना योग्य त्या सूचना देत होते. विद्यापीठ हायस्कुल समोरील सर्व भाग बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला होते.
आज सकाळी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर पाऊणे बारा वाजता ते श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहचले. यावेळी त्यांनी सपत्नीक अंबाबाई देवीचं दर्शन घेतल. दर्शनानंतर मंदिरातून बाहेर आल्यानंतर आंध्र प्रदेश मधून आलेल्या काही भाविकांनी हात उंचावून त्यांच्या नावाचा जयघोष केला.