उद्धव ठाकरेंचा शेमड्या पोरासारखा रडीचा डाव ; पराभव स्वीकारा

पुणे हिट अँड रन प्रकरणात सुप्रिया सुळे गप्प का ? आरोपीचा वकील पवार कुटुंबियांचा जवळचा

आमदार नितेश राणेंचा गौप्यस्फोट

कणकवली (प्रतिनिधी) : आशिष शेलार यांची तक्रार रास्त आहे. 4 जून ला एन डी ए चा मोठा विजय होणार हे स्पष्ट आहे. शेमड्या मुलासारखे उद्धव ठाकरे वागत आहेत. तुमचा पराभव स्वीकारा असे खडेबोल आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंना सुनावले. पुणे हिट अँड रन प्रकरणात सुप्रियाताई सुळे गप्प का ? आरोपीला दिलेला वकील पवार कुटुंबियांच्या घनिष्ट संबंधांतील असल्याची माहिती आहे. त्यामुळे एरव्ही सर्व पत्करणात आवाज उठविणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत व्यक्त व्हावे असेही नितेश राणे म्हणाले .निवडणूक आयोगामुळे मतदान कमी झाल्याची टीका जितेंद्र आव्हाड करत आहेत. हेही हास्यास्पद आहे. राजकीय जाणकार जे भाजपाच्या 250 किंवा 300 ह्या संभाव्य आकडेवारीवर भाष्य करताहेत त्यांना 4 जुनलाच मतपेटीतून उत्तर मिळेल. अशीच आकडेवारी 2014 आणि 2019 मध्ये सुद्धा असेच घडले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या 6 जून रोजी च्या दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की काहीही झाले तरी मराठा आरक्षण महायुती सरकार देणारच आहे. लोकशाहीत आंदोलनाचा हक्क प्रत्येकाला आहे. भाजपाच्या बड्या नेत्याने विनायक राऊत यांना निवडणुकीत 50 कोटी निधी दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की पराभव समोर असल्यानेच भास्कर जाधव असे आरोप करत आहेत. विनायक राऊत यांच्या प्रचाराला संजय राऊत का आले नाहीत ? उबाठा मध्ये एकमेकांचे पाय ओढले जातात, भाजपात नाही असे राणे यांनी सुनावले.

error: Content is protected !!