वैभववाडी (प्रतिनिधी) : पावसाच्या सुरवातीलाच वैभववाडी शहरात गटाराचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे संतप्त विरोधी पक्षातील नगरसेवकांनी रस्त्यावरील पाण्यात भर पावसात ठिय्या मांडून नगरपंचायतीचा निषेध केला. लाखो रुपये खर्च करून गटारातील पाणी रस्तावर येते आहे. याला नगरपंचायतीचा मनमानी कारभार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी उभाठाचे नगरसेवक रणजित तावडे, मनोज सावंत, अपक्ष नगरसेविका अक्षता जैतापकर, शहरप्रमुख शिवाजी राणे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर, मनोज मानकर, नारकर, आदी उपस्थित होते.
वैभववाडी शहरात नवीन गटार सुमारे 50 लाख रुपये खर्च करून गटार बांधले. गटार बांधताना नदीकडून शहराकडे बांधकाम करायला पाहिजे होते. मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी पूर्वी बांधलेले सुस्थितीतील गटारी तोडून ठेकेदारांना पोसण्यासाठी नवीन गटार लाईन बांधण्यात आली मात्र या गटारातून पाणी जात नसल्यामुळे सर्व पाणी रस्त्यावर येत असून बाजारपेठेत सगळीकडे पाणीच पाणी होत आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.तालुक्यात मंगवारी दुपारनंतर जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला. या पावसाने गटारातील पाणी रस्तावर आल्यामुळे आठवडा बाजारात आलेले व्यापारी व ग्राहकांची एकच ताराबाळ उडाली. ही माहिती मिळताच विरोधी नगरसेवक व व्यापाऱ्यांनी शहरातील सावली हॉटेल समोर रस्त्यावर भर पावसात चिखलच्या पाण्यात ठिय्या मारला.यावेळी त्यांनी नगरपंच्यातीच्या कारभारावर जोरदार टीका केली.
सत्ताधाऱ्याना आम्ही वारंवार सांगत होतो. गटारातून पाणी नदी पर्यंत जायला पाहिजे. मात्र कोणतेही नियोजन न करता गटार बांधन्यात आली. मुख्याधिकाऱ्यांना आम्ही वारंवार ही बाब निदर्शनास आणून देऊन त्यांच्याकडून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले असा आरोप नगरसेवक रणजित तावडे यांनी केला आहे. तर मनोज सावंत म्हणाले पावसाच्या सुरवातीलाच गटाराचे पाणी शहरात पसरले आहे. स्वतःच्या फायदयासाठी व ठेकेदारांना पोसण्यासाठी चांगले गटार तोडून नवीन गटर बांधले आहे. तेही अर्धवट राहिल्यामळे शहरांची अशी अवस्था झाली आहे. यावर उपाययोजना केली नाही तर आम्ही आंदोलन छेडणार असा इशारा त्यांनी दिला आहे. शहरात लाखो रुपये खर्च करून अशी अवस्था झाली आहे. सत्ताधाऱ्यांना जाग आली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.













