मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे धरणाच्या उर्वरित बांधकामाबाबत प्रश्न मांडून निधी आणण्याचा प्रयत्न करू: किरण सामंत
राजापूर (प्रतिनिधी) : सिंधुरत्न समृद्ध योजनेचे संचालक, शिवसेना नेते किरण उर्फ भय्या शेठ सामंत यांनी रविवारी राजापूर कोदवली येथील ब्रिटिश कालीन सायाबाच्या धरणाची पाहणी केली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले, शहर प्रमुख सौरभ खडपे, ठेकेदार गदगू जाधव, राजापूर नगर परिषद मुख्य लिपिक जितेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
सायबाच्या धरणाचे काम रखडल्यामुळे राजापूर शहराला पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. राजापूर शहराला पाणी पुरवठा करणारे हे एकमेव धरण असून त्या धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे अशी शहर वासियांची मागणी आहे.
सायबाच्या धरणाच्या कामाला अधिकचा निधी कसा मिळावा यासाठी आम्ही विचार विनिमय करू. वेळ पडल्यास अधिकचा निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करू असे आश्वासन यावेळी किरण सामंत यांनी यावेळी दिले. यासाठी आवश्यक ते प्रस्ताव राजापूर नगर परिषदेने पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी कार्यालय आणि आमच्याकडे सादर करावेत. आम्ही त्यासाठी पूर्णतः पाठपुरावा करू अशी माहिती यावेळी किरण सामंत यांनी दिली. यावेळी धरणासंबंधीच्या अडीअडचणी किरण सामंत यांनी समजून घेतल्या.











