राज्याचे गृहमंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, आचरा पोलीस स्टेशन यांना ऑनलाईन पत्र
आचरा (विवेक परब) : मालवण तालुक्यातील आचरा तिठा परिसर नेहमी गजबजलेला असतो. सध्या पर्यटन हंगाम सुरु असून या भागात रहदारीचे प्रमाण वाढलेले आहे. यामुळे बेदरकार पणे वाहने चालवणे, अल्पवयीन मुले परवान्या शिवाय वाहने चालवणे, वाहतूक कोंडी, वाहन पार्किंगची गैरसोय असे प्रकार अपघातांना आमंत्रण देणारे सुरु आहेत. वाहतूक पोलीस संबंधित ठिकाणी नसल्याने या सर्वांचा फटका पादचारी, वाहन धारकांना बसत असून याचा स्वानुभव आलेल्या आचरा येथील जेष्ठ नागरिक तथा साहित्यिक सुरेश शामराव ठाकूर(गुरुजी) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल जाधव यांना ऑनलाईन पत्र पाठवले असून आचरा तिठा येथे कायम स्वरूपी वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी केली असून पुढील होणाऱ्या दुर्घटना टाळण्याची विनंती केली आहे.












